पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दादरमध्ये कापडाच्या दुकानाला लागलेली आग विझवण्यात यश

भिवंडीतील गोदामाला आग

मुंबईमध्ये आगीचे सत्र सुरुच आहे. दादरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

 

...तर 'तुम्ही' सगळेच भस्मसात व्हाल; मनसेचा वारिस पठाणांना इशारा

दादर पूर्व येथील दादासाहेब फाळके मार्गावरील कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. सकाळी पावणे सहाच्या दरम्यान ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ५ फायर इंजीन आणि ४ पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल पाऊण तासानंतर ही आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. 

दिशा कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री आंध्रप्रदेश दौऱ्यावर