पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; पोलिस उपमहानिरीक्षकावर गुन्हा

पॉक्सो कायदा (संग्रहित छायाचित्र)

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वाढदिवसाच्या पार्टीत एका १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आयपीएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपमहानिरीक्षक (मोटर ट्रान्सपोर्ट विभाग, पुणे) निशिकांत मोरे असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून तळोजा पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचारविरोधी कायदा (पॉक्सो) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अमृता फडणवीस विरुद्ध सेना; ठाणे पालिका अ‍ॅक्सिस बँकेतील खाती बंद करणार

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक मोरे आणि पीडित मुलीचे वडील हे मित्र आहेत. सहा महिन्यांपूर्वी दि. ५ जून रोजी मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीत मोरे अचानक आले आणि त्यांनी दारुची मागणी केली. त्यांच्या घरामध्ये मद्य प्राशन केले. त्यानंतर मुलीने कापलेला केक तिच्या गालावर आणि अंगाला लावून तिच्यासोबत अश्लील वर्तन केले. हा प्रकार काहींनी मोबाइलवर शूटही केला. मोरेंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले. मात्र, नातेवाईकांनी व्हिडिओ डिलिट करण्यास नकार दिला. 

तरुणाला मारहाण करुन मुंडण करणाऱ्या ४ शिवसैनिकांना अटक

गेल्या सहा महिन्यांपासून पीडित मुलीचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते. अखेर त्यांना गुरुवारी यश आले. मोरे यांच्याविरोधात तळोजा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

राहुल गांधी खोटे बोलणाऱ्यांचे सरदा

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fir registered against deputy inspector general nishikant more for molestation and mistreatment of a minor girl