पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CAA विरोधात नागपाड्यात आंदोलन करणाऱ्या २०० महिलांवर गुन्हा दाखल

महिला आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) विरोधात नागपाडयातील आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत आहे. याप्रकरणात २०० हून अधिक आंदोलनकर्त्यां मुस्लीम महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या साहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांच्या तक्रारीनंतर  विविध कलमान्वये आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दिल्ली विधानसभेसाठी आज मतदान, ७० जागेसाठी ६७२ उमेदवार रिंगणात

सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीच्या विरोधात  नागपाड्यात मोठ्या संख्येने स्थानिक महिला आंदोलनात उतरल्या आहेत. नागपाड्यातील मोरलँड रस्त्यावर ठिय्या दिला आहे. नोकरदार महिला, महाविद्यालयीन तरुणी, ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील महिला या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 

'अर्थसंकल्पावरील सीतारमन यांचं भाषण म्हणजे सत्यनारायणची

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नसीम सिद्दिकी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले होते. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागण्या मान्य केल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका महिलांनी घेतली होती. आंदोलनकर्त्या महिलांना यापूर्वी पोलिसांनी नोटिसा धाडल्या होत्या. शुक्रवारी काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:FIR registered against around 200 protesters oragnisers protesting against CAA NRC NPR in Nagpada