पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई: तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात गुन्हे दाखल

तबलिगी जमात (संग्रहित छायाचित्र)

दिल्लीतील मरकजवरून आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांनी स्वत:हून पुढे येऊन उपचार करुन घ्यावेत असे महापालिकेकडून आवाहन करण्यात आले होते. मात्र वारंवार सांगून देखील योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर तबलिगी जमातच्या १५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईच्या आझाद मैदान पोलिस ठाण्यात १५० जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

माध्यमांच्या सरकारी जाहिराती २ वर्षे बंद करा - सोनिया गांधी

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मरकजमध्ये तबलिगी जमातच्या लोकांचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला देशासह परदेशातून आलेले अनेक लोकं सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येताच एकच खळबळ उडाली होती. मुंबईतून देखील अनेक जण या कार्यक्रमात सहभागी झाले होते. मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण हे मरकजमध्ये सहभागी झालेले आहेत.

'हनुमानासारखा पर्वत उचलायचा नाही, घरी थांबूनच जयंती साजरी करा'

दिल्लीवरुन आलेल्या तबलिगी जमातच्या लोकांमुळे मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी महापालिकेकडून खबरदारी घेतली जात आहे. वारंवार त्यांना पुढे येऊन उपचार घ्यावेत असे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांनी देखील ट्विटरद्वारे तबलिगी जमातच्या लोकांनी स्वत:हून पुढे येऊन आपली माहिती द्यावी असे आवाहन केले आहे. मात्र कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळे शेवटी महानगरपालिकेने आझाद मैदानात जाऊन मुंबईतील १५० लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यास सांगितले. 

वाड्यामध्ये २० लाखांचा बेकायदेशीर सॅनिटायझरचा साठा जप्त