पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांविरोधात गुन्हे दाखल

अजित पवार

राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एमआरए पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घोटाळा प्रकरणी ५ दिवसांत या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. 

कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही: संजय दत्त

२५ हजार कोटींचा राज्य सहकारी बँक घोटाळा आहे. यामध्ये अजित पवार, हसन मुश्रीफ, आनंदराव अडसूळ, विजयसिंह मोहिते-पाटील, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. सुरींदर अरोरा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने या प्रकरणात ५ दिवसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज एमआरए पोलिस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा. दं. वि. कलम ४२०, ४०९, ४०६, ४६५, ४६७, ४६८, ३४, १२० (ब) अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रम्पसमोर मोदी म्हणाले, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा, आमचं आम्ही बघू!

राज्य सहकारी बँकेच्या चौकशी अहवालामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर ठपका ठेवण्यात आला होता. सूतगिरण्या तसेच इतर सहकारी संस्थांना बेहिशेबी पैसे वाटप केल्याचा ठपका राज्य बँकेवर ठेवण्यात आला आहे. सुमारे १६०० कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात  २००१ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचे आदेश दिले होते. अहवालात तत्कालीन संचालक मंडळावरच ठपका ठेवण्यात आला होता. 

'पुढची २५ वर्षें या देशात भाजपचीच सत्ता असणार'