पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिनेमाच्या शूटिंगवेळी कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण - मुख्यमंत्री

महाराष्ट्र पोलिस

सिनेमाच्या शूटिंगवेळी पोलिस संरक्षण देण्याची मागणी निर्मात्यांनी केली, तर त्यांना पोलिस संरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. ठाण्यात घोडबंदर रोड येथे फिक्सर या वेब सीरिजच्या कॅमेरामन आणि इतर कर्मचाऱ्यांना गुंडांकडून मारहाण करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वरील माहिती दिली.

सिनेमांच्या किंवा टीव्ही मालिकांच्या शूटिंगसाठी परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी सर्व परवानग्या मिळतील. येत्या १५ ऑगस्टपासून या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. गेल्या दीड महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काम सुरू करण्यात आले आहे.

सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये यापुढे मराठी अनिवार्य भाषाः मुख्यमंत्री

सिनेमाच्या शूटिंगवेळी कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. फिक्सर वेब सीरिजच्या शूटिंगवेळी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ८ जणांपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी तिघे जण फरार आहेत. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल. ठाणे आणि वसई-विरार भागात शूटिंगसाठी खूप चांगल्या जागा आहेत. अनेक निर्माते या ठिकाणी शूटिंग करतात. पण शूटिंगसाठी परवानगी मिळवण्यासाठी काहीवेळा दलाल त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यातूनच वादावादी होते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा लवकरात लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आपण ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.