पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भांडूपजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरु

मध्य रेल्वे

भांडूप स्थानका दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दुपारी तीनच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून धीम्या आणि जलद मार्गावरील लोकल वाहतूक सुरु करण्यात आली असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे. लोकलसेवा जरी सुरु झाली असली तरी सुध्दा मध्य रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे. 

सत्ता येताच सरकारी जमिनीवरील मशिदी हटवूः भाजप खासदार

भांडूप स्थानकाजवळ दुपारी  ३ वाजता सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. त्यामुळे सीएसएमटीच्या दिशेने येणारी अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील फास्ट आणि स्लो वाहतुकीवर परिणाम झाला होता. भांडूप ते मुंलुंड आणि विकोळी ते कांजूरमार्ग दरम्यान लोकल एकामागे एक उभ्या होत्या. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे सर्वच स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. मध्य रेल्वे प्रशानाने घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम पूर्ण केले. लोकल वाहतूक सुरु झाली आहे. मात्र वाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे.  

मुंबईत फटका गँगला रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून नवा उपाय