पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भरधाव कारची पोलिसांच्या गाडीला धडक; पिता-पुत्रांचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

मुंबईमध्ये भरधाव कारने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. या अपघातामध्ये पिता-पुत्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. पूर्व द्रूतगती महामार्गावर घाटकोपरजवळ ही घटना घडली आहे. अपघातामध्ये कारमधील ७ जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरु आहेत. मंगळवारी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हा अपघात झाला आहे. याप्रकरणी पंतनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

पुन्हा अर्णवला भेटलो... कुणालचे नवे ट्विट, तीन विमान कंपन्यांची बंदी

पूर्व द्रूतगती महामार्गावर रमाबाई आंबेडकर नगरजवळ पंतनगर पोलिसांची टाटा सुमो कार रस्त्याच्या कडेला उभी होती. सचिन धमाले (३८ वर्ष) हा इको कार चालवत होता. भरधाव असलेली इको कारने पोलिसांच्या गाडीला धडक दिली. अपघातामध्ये सचिन धमाले आणि त्याचे वडील विष्णू धमाले (६२ वर्ष) यांचा मृत्यू झाला. तर इको कारमध्ये असलेले इतर ७ जण जखमी झाले. 

सायना नेहवालचा भाजप प्रवेश

सचिनच्या कुटुंबातील ९ जण नाशिक येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटपून ते मुंबईतील अॅन्टॉपहिल येथील घरी परत येत होते. त्याच दरम्यान रमाबाईनगर येथे त्यांच्या गाडीला अपघात झाला. हा अपघात ऐवढा भीषण होता की अपघातामध्ये पोलिसांची गाडी आणि इको कारचे मोठे नुकसान झाले आहे. सचिन निष्काळजीपणाने वाहन चालवत होता त्यामुळे हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. 

जेडीयू नेत्याने प्रशांत किशोर यांची तुलना केली 'कोरोना विषाणू'शी