पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रालयाबाहेर शेतकरी संघटनेचे आंदोलन; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

शेतकरी संघटनेचे आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसीईपी) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

अमित शहांच्या भेटीनंतर फडणवीस म्हणाले, लवकरच नवे सरकार येईल पण...

या आंदोलनावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्र्यालयाच्या गेटवर दूध फेकले. तसंच सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, रविकांत तुपकर, अमोल हिप्परगे, अमर कदम आणि आमदार देवेंद्र भुयार यांच्यासह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. 

आता 'तरूण भारत'मधून संजय राऊतांवर निशाणा, बेताल म्हणून टीकास्त्र

प्रादेशिक व्यापार कराराला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेच नाही तर अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीमध्ये असलेल्या २५० शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत वर्किंग ग्रुपची बैठक झाली या बैठकीमध्ये देशभरामध्ये या कराराच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या करारामुळे देशातील शेतकरी उध्वस्त होणार असून दूध व्यवसाय कोलमडून जाईन, असे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. 

SBI खातेधारकांनो ३० तारखेपर्यंत जमा करा हे प्रमाणपत्र, नाहीतर...