पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलीसह 'मातोश्री'त घुसणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी रोखले

मुलीसह 'मातोश्री'त घुसणाऱ्या शेतकऱ्यास पोलिसांनी रोखले

तक्रार घेऊन आलेल्या पनवेल येथील एका शेतकऱ्याने आपल्या सात ते आठ वर्षांच्या मुलीसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात येते. हा शेतकरी तक्रार घेऊन मातोश्रीत जाण्याचा प्रयत्न करत होता. परंतु, पोलिसांनी त्याला वेळीच रोखले. या शेतकऱ्याला पोलिसांनी गाडीत बसण्याची विनंती केल्यानंतरही तो ऐकत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला धरुन गाडीत बसवले आणि खैरवाडी पोलिस ठाण्यात नेले. 

नाराज नाही पण बदनाम करणाऱ्यांची माहिती CM ठाकरेंना दिलीः सत्तार

या शेतकऱ्याच्या हातात एक फाईल होती. त्यात बँकेशी संबधित काही कागदपत्रे असल्याची शक्यता आहे. या शेतकऱ्याने यापूर्वी मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार केल्याचे बोलले जात आहे. तिथे काहीच न झाल्याने या शेतकऱ्याने रविवारी आपल्या मुलीसह थेट मातोश्री गाठले. यावेळी या शेतकऱ्याने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याला रोखले. पण हा शेतकरी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीच नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला गाडीत बसवून खैरवाडी पोलिस ठाण्यात नेले.