पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील ६००० पोस्ट्स हटविल्या, कशासाठी माहितीये?

प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट हटविण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. यंदाच्या वर्षी आतापर्यंत अशा ६००० आक्षेपार्ह पोस्ट मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया साईट्सवरून हटविल्या आहेत. गेल्या वर्षी अशा ४८०० आक्षेपार्ह पोस्ट मुंबई पोलिसांनी काढून टाकल्या होत्या. दोन महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सोशल मीडियावरील पोस्ट्सवर जास्त लक्ष ठेवण्यात येणार आहे.

उत्तराखंड, हिमाचल प्रदेशमध्ये ढगफूटी; ३२ नागरिकांचा मृत्यू

मुंबई पोलिस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेतील सोशल मीडिया लॅबकडून इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या विविध वेबसाईट्सवर लक्ष ठेवले जाते. गरजेप्रमाणे काही पोस्ट काढून टाकल्या जातात किंवा ब्लॉक केल्या जातात. यामध्ये जातीय टिप्पणी, द्वेष पसरविणाऱ्या पोस्ट्स, आक्षेपार्ह व्हिडिओ, खोटी माहिती देणाऱ्या पोस्ट्स यांचा समावेश आहे. 

... नाहीतर आम्ही पूरग्रस्तांसाठी रस्त्यावर उतरू - शरद पवार

मुंबई पोलिस दलातील तंत्रकुशल कर्मचाऱ्यांकडून फेसबुक, ट्विटर, टिकटॉक, युट्यूब, टेलिग्राम्स यावर लक्ष ठेवले जाते. ऍडव्हान्स सर्चच्या माध्यमातून या साईट्सवरील पोस्ट्सवर लक्ष ठेवले जाते. जर या साईट्सवर काहीही आक्षेपार्ह दिसले, तर ते तात्काळ ब्लॉक केले जाते आणि संबंधित कंपनीच्या मदतीने तो मजकूर काढून टाकला जातो.