पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबई-पुणे रेल्वे सेवा ठप्पच; एसटीच्या ज्यादा बसेस धावणार

शिवनेरी बस

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून या मार्गावरील अनेक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहे. या प्रवशांच्या मदतीला लालपरी धावून आली आहे. एसटी महामंडळाकडून ज्यादा एसटी बसेस मुंबई-पुणे मार्गावर सोडण्यात आल्या आहेत. तसंच शिवनेरीच्या दररोज नियमित फेऱ्या व्यतिरिक्त ३२ अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित

कर्जत - लोणावळा दरम्यान रेल्वे रुळावर दरड कोसळल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावर रेल्वेसेवा ठप्प आहे. रेल्वे रुळावर ठिकठाकणी दरड कोसळली होती त्यामुळे रुळाचे मोठे नुकसान झाले होते. दुरुस्तीचे काम अद्याप सुरु असून त्याला अजून वेळ लागणार आहे. या मार्गावरील रेल्वेने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी हा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने या मार्गावर दोन्ही बाजूने दररोज शिवनेरीच्या जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. तसेच मागणीनुसार साध्या बसेस सुद्धा या मार्गावर धावणार आहेत. प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे. 

वाढदिवसाचा व्हिडिओ टिकटॉकवर टाकणे पडले महागात; तरुण अटकेत