पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवेंद्र फडणवीस २४ तासांच्या आतच आक्रमक, महाविकास आघाडीवर केली प्रश्नांची सरबत्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन २४ तासही झाले नाहीत. तत्पूर्वीच भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर प्रश्नांची सरबत्ती केली. शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ एक टि्वट करत अनेक प्रश्न विचारले आहेत. 

गोव्यातही राजकीय भूकंप- संजय राऊत

फडणवीस यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, गुरुवारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपून-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी?

या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? नियमबाह्य पद्धतीने हंगामी अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? स्वतःच्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?, असा सवाल त्यांनी केला.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचे समन्स

ते पुढे म्हणाले की, भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे, असे ते म्हणाले. 

यावर आता महाविकास आघाडीकडून काय उत्तर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'महाराष्ट्रातील लहान भावाला पंतप्रधानांनी साथ द्या'