पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मी पुन्हा येईन' म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख 'महाराष्ट्राचा सेवक'

देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर प्रोफाईलवरून साभार

तेराव्या विधानसभेच्या अखेरिस 'मी पुन्हा येईन...' असे म्हणणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता नवी ओळख त्यांच्या सोशल मीडिया हॅंडल्सवर प्रसिद्ध झाली आहे. ट्विटरवर त्यांच्या प्रोफाईलमध्ये 'महाराष्ट्राचा सेवक' एवढाच उल्लेख करण्यात आला आहे. 

चला चला राष्ट्रपती राजवट आली, दालने सोडण्याची मंत्र्यांची वेळ झाली

८ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या प्रोफाईलमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असा उल्लेख होता. त्यानंतर ९ नोव्हेंबरपासून ही ओळख महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री अशी बदलण्यात आली आणि आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर त्यांच्या प्रोफाईलमध्ये महाराष्ट्राचा सेवक असा उल्लेख करण्यात आला आहे. 

२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर राज्यात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. तेव्हापासून सलग पाच वर्षे ते या पदावर होते. आपण महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपदी येऊ असा त्यांना निवडणुकीपूर्वी विश्वास होता. यासाठीच त्यांनी तेराव्या विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात मी पुन्हा येईन..., अशी वाक्यरचना असलेली एक कविताही सादर केली होती. त्यावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली. 

..तर तो आमदार पुन्हा निवडून येणार नाही, अजित पवारांचे प्रत्युत्तर

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीनंतर भाजप आणि शिवसेना यांच्यातील मैत्री आणि युतीत दुरावा निर्माण झाला आणि तो वाढतच गेला. त्यामुळे भाजपने राज्यपालांना भेटून आपण सत्ता स्थापन करीत नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर कोणताच पक्ष राज्यपालांनी दिलेल्या मुदतीत सत्ता स्थापनेचा दावा करू न शकल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.