पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मांचा राजीनामा, शिवसेनेत प्रवेशाची चर्चा

प्रदीप शर्मा

ठाणे गुन्हे शाखेत कार्यरत असलेले चकमकफेम अधिकारी प्रदीप शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदीप शर्मा यांनी आतापर्यंत १०० हून अधिक एन्काऊंटर केले आहेत. गुरुवारी रात्रीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द केला. काही हिंदी वृत्तसंकेतस्थळे आणि वाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रदीप शर्मा हे राजकारणात प्रवेश करू शकतात. ते शिवसेनेत दाखल होऊन विधानसभा निवडणूक लढवू शकतात.

लखन भैय्या बनावट चकमकप्रकरणी प्रदीप शर्मा यांना २००८ मध्ये सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना काही महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा सेवेत रुजू करून घेण्यात आले होते. ठाण्यातील गुन्हे शाखेत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

शिवसेनेकडून आदित्य ठाकरेच मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

१९८३ मध्ये प्रदीप शर्मा पोलिस दलात भरती झाले होते. १९९० मध्ये मुंबईतील गुन्हेगारी नष्ट करण्यासाठी प्रदीप शर्मा आणि अन्य काही अधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी देण्यात आली होती. यावेळी घडलेल्या विविध चकमकींमध्ये प्रदीप शर्मा सहभागी झाले होते. त्यावेळी अंडरवर्ल्डची दहशत मोडून काढण्यात त्यांनी प्रमुख भूमिका निभावली होती.