पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'पुरोगामी, आंबेडकरवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्राचा डाव'

बाळासाहेब थोरात

एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने ज्या घाई गडबडीने एनआयएकडे दिला त्यावरून हा निर्णय काळजी वाढवणारा आहे, असे मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. तसंच, पुरोगामी, दलित, आंबेडकरीवादी चळवळीला नक्षलवादी ठरवण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे यातून स्पष्ट दिसत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. 

माझ्या 'त्या' वक्तव्याचा विपर्यास; इंदोरीकर महाराजांची दिलगिरी

एल्गार परिषद तपासाबाबत बोलताना बाळासाहेब थोरातांनी पुढे असे सांगितले की, 'हे व्यासपीठ पुरोगामी विचारांचे होते. तिथे कवी, साहित्यिक, विचारवंत यांनी आपले विचार मांडले. सत्ताधारी पक्षाच्या विचारधारेविरोधात विचार मांडले म्हणून त्यांच्यावर करावाई करणे चुकीचे आहे. हा पुरोगामी, आंबेडकरवादी विचार दाबण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. 

ब्रिटिश खासदाराला परत पाठवले, काँग्रेस नेत्याने केले समर्थन

तसंच, जर कोणी काही वेगळे वागले असेल, कोणाविरोधात काही पुरावे असतील तर आम्ही त्यांचे समर्थन करत नाही. परंतु एकूणच या प्रकरणाचा तपास ज्यापद्धतीने एनआयएकडे देण्यात आला त्याचा वेळ, काळ पाहिला तर सर्वच संशायस्पद वाटते, असे मत बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केले. 

डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग

दरम्यान, याआधी पुरोगामी विचारांच्या दाभोळकर, कलबुर्गी, पानसरे यांची हत्या करून त्यांचे विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. आता केंद्रातील भाजप सरकार पुरोगामी, आंबेडकरवादी विचार मांडणा-या एल्गारवर कारवाई करुन या विचारांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. एकूण सर्व परिस्थिती पाहता संशयाला जागा असून देशभरातून यावर चिंता व्यक्त केली जात असल्याचे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. 

'एल्गार परिषदेबाबत केंद्राने एवढी तत्परता का दाखवली?'