पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा प्रकार: एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे

'देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शपथ लोकशाहीला धरुन नाही. त्यांनी घेतलेली शपथ नियमांचे उल्लंघन करणारी आहे. लोकशाहीत मानसन्मान झाला पाहिजे. मात्र ते झाले नाही. लोकशाहीची पायमल्ली झाली आहे.', असे मत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.  राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आज सरकार स्थापनेचा दावा केला. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी १६२ आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  

आता सुप्रीम कोर्टाचे उद्यापर्यंत 'वेट अँड वॉच'

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीने १६२ आमदारांच्या नावानिशी आणि सह्यानिशी राज्यपालांना पत्र दिले आहे. १६२ आमदारांचा आकडा वाढू शकतो, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. लोकशाहीत ज्यांना जनतेने निवडून दिले आहे त्यांचा सन्मान केला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्यपालांनी तात्काळ आमच्या मागणीचा विचार केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

... या मागे माझा हात असल्याचे म्हणणे चुकीचे - शरद पवार

दरम्यान, भाजपकडे आवश्यक संख्याबळ नाही. त्यांनी आधीच सरकार स्थापन करणार नाही असे सांगितले होते. मात्र आवश्यक संख्याबळ नसताना रात्रीत शपथविधी झाला. त्यांच्याकडे खरंच संख्याबळ असते तर त्यांनी दिवसाढवळ्या शपथविधी घेतला असता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसंच, लोकशाही प्रक्रियांची पायमल्ली करून स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस यांचे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. 

'१६२ आमदारांना राज्यपालांसमोर उभं करण्याची आमची तयारी'