पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विधानसभेत खडसे आक्रमक, आदिवासी मंत्र्यांना झापले

एकनाथ खडसे

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे आज (बुधवार) विधानसभेत आपल्याच सरकारविरोधात आक्रमक दिसले. आदिवासी भागातील कुपोषणावरुन त्यांनी सरकारला धारेवर धरले. नूतन आदिवासी मंत्री अशोक उईके यांना खडसे यांनी झापले. कुपोषणाचे सर्वाधिक बळी हे युती सरकारच्या काळातच गेल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी विरोधकांपेक्षा एकनाथ खडसे हेच आक्रमक झाल्याचे दिसले.

विखे सुसंस्कृत नेते, पक्षांतराचा त्यांना दीर्घ अनुभव, खडसेंचा टोला

संतापलेले खडसे आदिवासी मंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत होते. आपले म्हणणे मांडत असताना खडसे यांनी उईके यांना टोलाही लगावला. तुम्ही पहिल्यांदा आमदार झालात आणि पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री झाला आहात त्याबद्दल तुमचे अभिनंदन असे त्यांनी म्हटले. यावर उईके यांनीही आपण दोनच दिवसांपूर्वी या खात्याचा पदभार स्वीकारला असला तरी आदिवासी संबंधित समितीवर कार्य केल्याची माहिती दिली. 

तत्पूर्वी, खडसे हे विधीमंडळात प्रवेश करत होते. त्यावेळी विरोधकांनी घोषणा देत त्यांचे स्वागत केले. अजित पवार आणि इतर नेत्यांची भेट घेत खडसे विधीमंडळात गेले. 

अर्थसंकल्प फुटल्याची सर्वंकष चौकशी करा, विरोधकांची मागणी

दोनच दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीही खडसे यांनी अप्रत्यक्षरित्या स्वपक्षावर टीका केली होती. त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही टीका केली होती.