एकनाथ खडसेंच्या प्रत्येक गोष्टीला मी उत्तर देणार नाही. त्यांनी त्यांचे म्हणणे जाहीरपणे मांडले. त्यांनी वरिष्ठांपुढे बोलायला हवे होते. मी त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्यांनी असे बोलणे टाळले असते तर बरे झाले असते. कारण तो मंचही तसा नव्हता, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिनी आयोजित कार्यक्रमात खडसे यांनी फडणवीस यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यावर फडणवीस यांनी आपल्या प्रतिक्रिया 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केली.
..तर शिवसेनेला पुढाकार घ्यावा लागेल, फडणवीसांचे वक्तव्य
गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला विलंब झाल्याचा खडसे यांचा आरोप त्यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळला. ते म्हणाले, स्मारकासाठी डिझाईन करायचे होते. स्मारकाची वर्कऑर्डरही निघाली आहे. यासाठी ४६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्याला विलंब लागला. पण आता त्याचे कामही सुरु होईल.
खडसे हे दाऊदशी बोलल्याचा आरोप होता. पण आमच्या सरकारच्या काळात एटीएसने अवघ्या १२ तासांत त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यांचे तिकीट हे केंद्रीय नेतृत्वाने कापले होते. राज्याचा याबाबत कोणताच निर्णय नव्हता.
ना. धों. महानोर यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे होणार उद्घाटन
दिल्लीला गेल्यानंतर त्यांची भेट भूपेंद्र यादव यांच्याशी झाली. यादव यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याशी दुसऱ्या दिवशी गाठ घालून देतो, असे म्हटलेही होते. परंतु, त्यांनी मुंबईला परत जायचे असल्याचे सांगितले होते, असेही ते म्हणाले.