पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जे झाले ते दुर्दैवी होते - एकनाथ खडसे

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे

अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय दुर्दैवीच होता. लोकांना हा निर्णय अजिबात आवडला नव्हता, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. खरंतर राज्यातील जनतेने भाजप आणि शिवसेना यांच्या बाजूने कौल दिला होता. पण मुख्यमंत्रीपदावरून या दोघांमध्ये जुळले नाही. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा भाजपचा निर्णय हा केवळ एक पर्याय होता. या पर्यायाच्या माध्यमातून केवळ सत्ता आणि मुख्यमंत्रीपद राखणे एवढाच पर्याय भाजपपुढे होता, असेही एकनाथ खडसे यांनी सांगितले.

अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

गेल्या शनिवारी नाट्यमय घडामोडीत राज्यातील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सगळ्या घडामोडी घडून चार दिवस होत असतानाच मंगळवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पुन्हा एकदा सत्तानाट्याला वेगळे वळण लागले. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

बाळासाहेब थोरात यांना हंगामी विधानसभाध्यक्ष कराः जयंत पाटील