पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकनाथ गायकवाड मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष

एकनाथ गायकवाड

दोनवेळा खासदार राहिलेले एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्षांनी गायकवाड यांची नियुक्ती केल्याचे निवेदन अखिल भारतीय काँग्रेस समितीने प्रसिद्ध केले आहे.

विशेष म्हणजे निवेदनावर काँग्रेस अध्यक्षांचे नाव लिहिलेले नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर अजूनही नवीन अध्यक्षांची नेमणूक करण्यात आलेली नाही. 

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियोजन आणि तयारीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा राजीनामा पक्ष नेतृत्वाने स्वीकारलेला नाही. त्यांनीच आगामी निवडणुकीत मुंबई काँग्रेसचे नेतृत्व करावे असे त्यांचे मत आहे. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर देवरा यांनी राजीनामा दिला होता. आणखी एका कार्याध्यक्षाची नेमणूक केली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मिलिंद देवरा यांनी गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गायकवाड यांच्या जनसंपर्काचा पक्षाला मोठा फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच पक्षाने माझ्या राजीनाम्यावर लवकरात लवकर विचार करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.