विधानसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचा आरोप करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातील पुरावे पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्द केले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एकनाथ खडसे यांनी ही माहिती दिली आहे. आमच्याविरोधात काम करणाऱ्या या भाजपच्या कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई करा अशी विनंती त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
Eknath Khadse, Bharatiya Janata Party (BJP): In the elections, some prominent workers of our party worked against us. I have given Chandrakant Patil (BJP Maharashtra President) some audios and videos as evidence and requested him to take action against such people. pic.twitter.com/jOaPJYbeGE
— ANI (@ANI) December 9, 2019
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर
एकनाथ खडसे यांनी सांगितले की, 'विधानसभा निवडणुकीवेळी भाजपच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमच्याविरोधात काम केले. यासंदर्भातील काही ऑडिओ आणि व्हिडिओ क्लीप या स्वरुपातील पुरावे माझ्याकडे असून ते मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले आहेत. तसंच त्यांच्याकडे या भाजप कार्यकर्त्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.'
नागरिकत्व दुरुस्ती विधेयक: PM मोदींकडून अमित शहांचे कौतुक
भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे पक्षावर नाराज असून ते वारंवार आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे. नाराज असलेले खडसेंचे भाजपवर सतत हल्ले सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी खडसे यांनी पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांचा पराभव पक्षातील लोकांमुळेच झाला असल्याचे म्हटले होते. कोणी पक्षविरोधात काम केले त्यांची नावांसहित वरिष्ठांकडे तक्रार केली असल्याचे खडसे यांनी सांगितले होते. आता खडसेंनी थेट पक्षविरोधी काम करणाऱ्यांचे पुरावे पक्षश्रेष्ठींना दिले आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठींकडून काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.