पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे रद्दीत विकले: खडसे

एकनाथ खडसे

सर्वांना एकत्र घेऊन लढले असते तर २५ जागांमध्ये नक्की वाढ झाली असती, अशी प्रतिक्रिया देत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. तसंच, सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे होते. ते आम्ही रद्दीमध्ये विकले. कारण त्यावेळी चांगला भाव होता, असे खडसे यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे शिवसेनेला मुंबईत पहिला धक्का

'पक्ष कधीच चूकत नसतो. पक्षाकडे जे नेते असतात. ज्याच्या हातात धुरा दिलेली असते त्यांचा निर्णय चूकू शकतो, असे सांगत खडसेंनी भाजप नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाच्या विस्तारासाठी ज्यांनी मदत केली अशा लोकांना बाजूला ठेवल्याचा परिणाम या निवडणुकीत झाला', असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

योग्यवेळी योग्य गोष्टी सांगेन, काळजी करु नकाः देवेंद्र फडणवीस

दरम्यान, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, प्रकाश मेहता, विनोद तावडे यांच्यासारख्यांना तिकीट दिले नसते तरी त्यांना एकत्र घेऊन सक्रिय केले असते. तर २५ जागा नक्की वाढल्या असत्या, अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली आहे.  तसंच, सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे रद्दीत विकले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

'मातोश्रीवर बसून आदेश देणे सोपे; आता मैदानामध्ये या'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ekanath khadase says ajit pawar is an accused in the massive irrigation scam and faces many allegations