पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मंदी असती तर चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली नसती'

केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद

देशात मंदी असती तर २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली नसती. अर्थव्यवस्था सुरळीत असल्यामुळे चित्रपट गृहाबाहेर मोठी गर्दी झाली, असा तर्क केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी लावला आहे. शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आर्थिक मंदीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी अजब तर्क लावला. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ओला-उबेरमुळे मंदी आल्याचे वक्तव्य केले होते. या विधानाची चांगलीच चर्चा रगंल्याचे पाहायला मिळाले होते. या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे रवी शंकर प्रसाद यांच्या या विधानाचे काय पडसाद उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

खड्डयात जाण्याची सवय लावून घेऊ नका!

यावेळी रवी शंकर प्रसाद  म्हणाले की,  बेरोजगारीवरील एनएसएसओने दिलेला अहवाल चुकीचा आहे. आम्ही सर्वांना सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिलेले नाही. देशात मेट्रो आणि रस्ते बांधणीच्या कामामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे, असा दावाही त्यांनी केला. 
मंदीच्या प्रश्नावर चित्रपटाचा दाखला देताना म्हणाले की, २ ऑक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपट समीक्षक कोमल नाहाटा यांनी दोन ऑक्टोबरला तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केल्याचे सांगितले. हे सुदृढ अर्थव्यवस्थेचे लक्षण आहे. मला चित्रपट आवडतात. चित्रपट मोठे व्यवसाय करतात. अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून देशाने तीन चित्रपटांमधून १२० कोटी कमावले आहेत. अशी माहिती देखील त्यांनी दिली. 

सलग १४ वेळा निवडून आलेला 'माय का लाल दाखवा', पवारांचे आव्हान

उल्लेखनिय आहे की, गेल्या काही महिन्यांपासून देशात आर्थिक मंदीचे वातावरण असले तरी चित्रपटगृहांच्या व्यवसायाला अच्छे दिन असल्याचे देशातील सर्वात मोठ्या पीव्हीआर पिक्चर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी कमल ग्यानचंदानी यांनी म्हटले होते. मंदीमुळे निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणापासून दूर राहण्यासाठी लोक चित्रपटगृहाला प्राधान्य दिले जात असल्याचा उल्लेखही त्यांनी केला होता.  

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Economy of country is sound that is why there is a return of Rs 120 cr in a day Union Minister Ravi Shankar Prasad on economic slowdown