पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ, प्रायोजकांच्या संख्येत घट

मुंबईतल्या गणेशोत्सवासही मंदीची झळ

गणेशोत्सव आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे, मात्र मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळावर मंदीचे ढग दाटू लागले आहेत. मुंबईतल्या अनेक छोट्या सार्वजनिक मंडळांना मिळणाऱ्या प्रायोजकांच्या संख्येत २५ टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळत आहेत. शहरात एकूण १३ हजार सार्वजनिक गणेश मंडळं आहेत. त्यातील  ३ हजार ७० ही मोठी मंडळं आहेत. तर उर्वरित लहान मंडळं आहेत. या मंडळांना आता प्रायोजकांकडून मिळणाऱ्या निधीत घट झाली आहे. 

गणपतीच्या सुवर्णालंकार मागणीत ७०% घट

मुंबईतील काही प्रमुख आणि मोठी मंडळं आहेत ज्यांच्याकडे जाहिरातीसाठी अनेक प्रायोजक येतात. मंडळांच्या प्रवेशद्वारापाशी करण्यात येणारे जाहिरातींचे दर हे ठरलेले असतात. साधरण प्रसिद्ध मंडळांच्या प्रवेशद्वारांवर आपल्या ब्रँडची जाहिरात करण्यासाठी प्रायोजक चांगली रक्कम मोजतात. एका प्रवेशद्वारावर जाहिरातीसाठी जवळपास १ लाख रुपये मिळतात. लालबागमध्ये  दरवर्षी या जाहिरातींसाठी १०  लाख रुपये मोजायला प्रायोजक तयार असतात. मात्र यावर्षी  किमतीत घट झाली आहे. आता ७ ते ८ लाखच प्रायोजकांनी मोजले असल्याची माहिती चिंचपोकळीचा चिंतामणी  सार्वजनिक मंडळाचे प्रवक्ते संदीप परब यांनी दिली. मोठ्या मंडळांना जाहिराती मिळतात. पण यावर्षी अनेक बिल्डरही जाहिरातींसाठी पैसे मोजायला तयार नाहीत. लहान मंडळांना त्याचा जास्त फटका बसू शकतो अशी भीतीही परब यांनी व्यक्त केली. 

आतापर्यंत प्रायोजक गणेश मंडळांच्या प्रत्येक द्वारावर जाहिरातीसाठी पैसे मोजायला तयार होत मात्र यावर्षीपासून प्रायोजकांचीही उदासिनता पहायला मिळत आहेत. पूर्वी जी कंपनी   पाच प्रवेशद्वारावर जाहिरातींसाठी पैसे मोजायला तयार व्हायची तीच आता केवळ दोन प्रवेशद्वारावरच्या जाहिरातींसाठीच पैसे मोजत आहे अशी माहिती अंधेरीचा राजा मंडळाचे खजिनदार सुबोध चिटणीस यांनी दिली. 

किंग्ज  सर्कलजवळील  गौड सारस्वत ब्राह्मण सेवा  मंडळ (जीएसबी) हे सर्वात श्रीमंत मंडळापैकी एक आहे. या मंडळातील सर्वाधिक पैसे हे पुजा आणि दानातून येतात. २०१६ मध्ये पूजा आणि दानपेटीतून आलेली एकूण रक्कम ही ८.१५ कोटी होती.  गेल्यावर्षी ६६ हजार पूजा झाल्या यावर्षी हा आकडा ६ हजारांनी वाढेल. मात्र जाहिरातीनून येणारं उत्पन्न हे केवळ २०% आहे असं जीएसबीच्या विश्वस्तांनी सांगितलं.  

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांविरोधात गुन्हे दाखल

ज्यावेळी प्रायोजक मिळत नाही तेव्हा प्रत्येक व्यक्ती २ हजार रुपयांची देणगी देतो. त्याचप्रमाणे मंडळातल्या बाकीच्या व्यक्ती इच्छेप्रमाणे खर्च उचलतात. आमचा मंडळाचा खर्च हा २ लाख रुपये आहे मात्र हा  खर्च कमी करून उर्वरित रक्कम पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे अशी माहिती सर्वोदय मित्र मंडळाचे सदस्य वसंत मुळीक यांनी दिली.