पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँक घोटाळा: आणखी तीन संचालकांना अटक

पीएमसी बँक

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघांना मंगळवारी अटक केली. जगदिश एम. मुक्ती बावीसी आणि तृत्पी बने अशी या संचालकांची नावे असून बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यापूर्वी एचडीआयएल ग्रुपचे राकेश व सारंग वाधवान, बँकेचे माजी चेअरमन वरयाम सिंग, माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना अटक करण्यात आली होती.

पीएमसी बँक घोटाळाः भाजप नेत्याच्या मुलाला अखेर अटक

पीएमसी बँकेतील ४ हजार ३५५ कोटींचा कर्ज घोटाळा उघडकीस आले होते. बँकेच्या कामकाजात अनियमितता आणि रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलला देण्यात आलेल्या कर्जाची योग्य माहिती न दिल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले होते. देशातील पहिल्या दहा सहकारी बँकांमध्ये समावेश असणाऱ्या पंजाब आणि महाराष्ट्र बँकेत झालेल्या प्रचंड घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांच्यावर निर्बंध लादले होते.

पीएमसी बँकेच्या खातेधारकांचे आझाद मैदानावर आंदोलन

त्यामुळे बँकेतील ठेवीदार मोठे अडचणीत आले आहेत. आर्थिक गैरव्यवहारांमुळे रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेतील व्यवहारांवर निर्बंध घातल्यानंतर अनेक खातेदारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर टप्याटप्याने रिझर्व्ह बँकेने बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: Economic Offences Wing arrested 3 Directors of the Board of Punjab and Maharashtra Co operative PMC Bank