पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फसवून २ लाखांचे सोन्याचे दागिने चोरले आणि तुरुंगात जावे लागले...

आरोपींना अटक

चेंबूरमध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची १.८९ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका ४६ वर्षांच्या व्यक्तीला अटक केली. संजय दत्ताराम मागडे असे या व्यक्तीचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या साह्याने पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावला. दोन आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आली असून, दुसऱ्याचा शोध घेतला जातो आहे.

देश आर्थिक दिवाळखोरीच्या दिशेनेः प्रकाश आंबेडकर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश हेमदेव (वय ४४) यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली होती. २७ डिसेंबर २०१९ रोजी ही घटना घडली. दिनेश हेमदेव शीव-वांद्रे लिंक रोडवरून जात असताना दोन व्यक्तींनी त्यांना गाठला. यावेळी त्या दोघांनी दिनेश हेमदेव यांच्याकडे एवढे सोने घालून का फिरताहात, असे विचारले. अंगावरील दागिने काढून एका पिशवीत ठेवा, असा सल्ला त्या दोघांनी दिला. दागिने पिशवीत ठेवताना त्यांनी ते चोरले. दागिन्यांमध्ये सोन्याची चेन, अंगठी, ब्रेसलेट यांचा समावेश होता. या सर्वाची किंमत १.८९ लाख रुपये आहे.

VIDEO:जेव्हा तुझा बाप..,सीएएवरुन जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य

मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कलम ४२० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शीव पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक ललिता गायकवाड म्हणाल्या, आम्ही आरोपीकडून चोरलेले सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. दुसऱ्या आरोपीचा शोध घेतला जातो आहे. आरोपींची पार्श्वभूमी नक्की काय आहे, याचाही शोध घेतला जातो आहे.