पवईतील मिंलिंदनगर येथे डंपरला अपघात झाला. मिलिंदनगर येथे मेट्रोच्या बॅरिगेटिंगमध्ये डंपर घुसला. या अपघात सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर याठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. विक्रोळी -जोगेश्वरी लिंकरोडवर वाहनांच्या लांबच -लांब रांगा लागल्या आहेत.
पुलवामात लष्कराला मोठे यश, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
मिलिंदनगर येथे मेट्रोचे काम सुरु आहे. या कामासाठी रस्त्याच्या मध्यभागी बॅरिगेटिंग लावले आहेत. सकाळ्या सुमारास डंबरने या बॅरिगेटिंगला धडक दिली. या अपघातानंतर याठिकाणी वाहतूक कोंडी झाली असून विक्रोळी-जोगेश्वरी लिंकरोडवर एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
कमलेश तिवारी हत्याः दोन्ही आरोपींना गुजरात-राजस्थान सीमेवरुन
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणावरुन जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. वाहतूक सुरळित करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरु आहे.