पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महाविकास आघाडी अंतर्गत मतभेदामुळे तुटेलः एकनाथ खडसे

भाजप नेते एकनाथ खडसे

महाविकास आघाडी ही अंतर्गत मतभेदामुळे तुटेल असे भाकित भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले. मी अजूनही भाजपमध्येच आहे, हे त्यांनी आवर्जून सांगितले. भाजपचे राज्यव्यापी अधिवेशन आज (रविवार) नवी मुंबईत सुरू आहे. तत्पूर्वी शनिवारी त्याच ठिकाणी पदाधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत खडसे बोलत होते.

राज्य सरकारला सुध्दा स्वतंत्र चौकशीचा अधिकार: शरद पवार

राज्यात इतक्यात मध्यावधी निवडणुका होतील असे वाटत नाही. मध्यावधी निवडणुका होण्यासाठी आणखी काही काळ जावा लागेल, असेही ते म्हणाले.  महाविकास आघाडी सरकारमध्ये काही गोष्टींवर मतभेद आहेत. हे मतभेद आता उघड होऊ लागले आहेत. त्यामुळे तिढा वाढून हे सरकार पडेल.

'...तर भीमा-कोरेगाव प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन करु'

पुढे ते म्हणाले, मी अजूनही भाजपमध्येच आहे आणि सक्रियही आहे. पक्षातील एखाद्या व्यक्तीवर मी टीका केली असेल, पण पक्षावर कधीही टीका केली नाही, हे त्यांनी जोर देऊन सांगितले.

उद्या कशाला आत्ताच सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं भाजपला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:due to differences maha vikas aghadhi government will collapse says bjp leader eknath khadse