पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुष्काळग्रस्त मराठवाडा, विदर्भात यंदाही पाऊस कमी; स्कायमेटचा अंदाज

मराठवाडा, विदर्भात यंदाही पाऊस कमी

यंदा मान्सूनचे उशीराने आगमन होण्याचे संकेत असतानाच आता विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. खासगी हवामान संस्था 'स्कायमेट'ने नुकताच विभागवार मान्सूनचा अंदाज वर्तविला. त्यामध्ये मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा कमी किंवा अपुरा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मान्सून ४ जूनला भारतात दाखल होणार

यंदा मान्सूनचे मुंबईत उशीराने आगमन होईल, असे स्कायमेटने आधीच म्हटले होते. पण त्याचवेळी यंदाचा पाऊस हा एकूण देशातच सरासरीपेक्षा काहीसा कमीच राहिल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा ९ टक्के पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. आधीच मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये सध्या तीव्र दुष्काळ आहे. त्यात पाऊसही कमी पडण्याचा अंदाज असल्यामुळे या भागांमध्ये तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण होऊ शकते.

जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची ठिकाणे स्कायमेटने निश्चित केली आहेत. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या आधी ३ एप्रिल रोजी स्कायमेटने हा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर मंगळवारी (१४ मे) त्याचा पुन्हा आढावा घेण्यात आल्यावर स्कायमेटने आपल्या अंदाजात कोणताही बदल केलेला नाही. स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग म्हणाले, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि गुजरातचा पश्चिम भाग या सर्व ठिकाणी यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. एल निनो या घटकामुळे यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसावर परिणाम होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अरेरे! मुंबईत वरुणराजाचे उशीराने आगमन, स्कायमेटचा अंदाज

दरम्यान भारतीय हवामान खात्याने यंदाच्या वर्षी देशात सरासरीच्या जवळपास पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. जूनपर्यंत एल निनोचा परिणाम दिसेल. पण त्यानंतर हा घटक निष्प्रभ ठरेल आणि चांगला पाऊस पडेल, असे हवामान खात्याचे महासंचालक के. जे. रमेश यांनी म्हटले आहे.