पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डॉ. पायल तडवी आत्महत्या : आरोपींच्या चौकशीसाठी गुन्हे शाखेला अटींवर परवानगी

डॉ. पायल तडवी आत्महत्या

डॉक्टर पायल तडवी हिच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन सहकारी महिला डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी त्यांची गुन्हे शाखेच्या कोठडीत पूर्णवेळ रवानगी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला. आरोपी डॉक्टरांच्या चौकशीसाठी न्यायालयाने वेळ निर्धारित केली आहे. त्यावेळेत गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना चौकशी करता येणार आहे. एकूण चार दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा या वेळेत आरोपींच्या चौकशीसाठी परवानगी देण्यात आली आहे. संध्याकाळी सहानंतर आरोपींना पुन्हा भायखळा कारागृहात पाठविण्यात यावे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

त्या दिवसापासून आजपर्यंत कामावर गेलेलो नाही, पायलच्या पतीला दुःख अनावर

मुंबईतील नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्ये प्रकऱणी पोलिसांनी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक केली आहे. गेल्या सुनावणीवेळी सत्र न्यायालयाने आरोपींची १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. राज्य सरकारने हे प्रकरण तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे दिले आहे. त्यामुळे गुन्हे शाखेने आरोपींची चौकशी करण्यासाठी त्यांची कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यावर पूर्णवेळ कोठडी देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. दरम्यान आरोपींनी आपण पायलवर जातीवाचक टीका केली नव्हती, असे न्यायालयापुढे सांगितल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दाखवले आहे. आम्ही केवळ तिला भगौडी म्हटलो होतो, असे आरोपींनी म्हटले आहे. 

पायल तडवी आत्महत्याः तिन्ही महिला डॉक्टरांना न्यायालयीन कोठडी

महाविद्यालय आणि रुग्णालयात होत असलेल्या मानसिक छळाला कंटाळून पायल तडवी हिने वसतिगृहातील राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. पायलच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन सहकारी डॉक्टरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले, त्याचबरोबर ऍट्रोसिटी आणि अन्य कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. या तिन्ही डॉक्टरांना रुग्णालयाने निलंबित केले आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Dr Payal Tadvi suicide case Bombay High Court has given custody of the three accused doctors to Crime Branch for 4 days for a specific time period