पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंगरी इमारत दुर्घटनेला सरकार जबाबदार - वारिस पठाण

डोंगरी इमारत दुर्घटना

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये पावसामुळे भिंत कोसळणे, इमारतीचा भाग कोसळण्याच्या घटना घडत आहे. अशीच घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबईच्या डोंगरी भागामध्ये घडली आहे. डोंगरीतील केसरबाई या 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळून यामध्ये 40 पेक्षा अधिक जण अडकले.  या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, मुंबईत वारंवार होणाऱ्या या दुर्घटनेवर विरोधक आक्रमक झाले आहे. एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली.

Dongri Building Collapses Live : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

केसरबाई इमारत दुर्घटना प्रकरणी वारिस पठाण यांनी सरकारवर टीका केली. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशाप्रकारच्या दुर्घटनेनंतर सरकार फक्त मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत देऊन विषय संपवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी सरकारकडून नेमक्या काय उपाय योजना करणार आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे. 

PHOTOS : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

दरम्यान, या परिसराती धोकादायक इमारतीवर मी अनेकदा आवाज उठवला आहे. गेल्या 5 वर्षात या इमारतींचा मुद्दा विधानसभेमध्ये मांडला. त्यावर सरकारने नेहमीप्रमाणे फक्त आश्वासन दिले. मात्र यावर कोणतिही कारवाई करण्यात आली नसल्याचे वारिस पठाण यांनी सांगितले. त्यामुळे आज घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार असून ही दुर्घटना नसून हत्या असल्याचा आरोप वारिस पठाण  यांनी केला आहे.