पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंगरी दुर्घटना : अरुंद रस्त्यांमुळे बचाव कार्यास मोठा अडथळा

डोंगरी दुर्घटना

मुंबईतल्या डोंगरी परिसरातील केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत  १० जण मृत्युमुखी पडल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. जवळपास १५ कुटुंब हे  ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत पाच जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढलं असून जेजे आणि हबिब रुग्णालयात त्यांना उपचारांसाठी भरती करण्यात आलं आहे. मात्र बचाव कार्यात अरूंद रस्त्यांमुळे मोठा अडथळा येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. 

Dongri Building Collapses Live : दोघांचा मृत्यू, तिघे जखमी

'ही इमारत १०० वर्षे जुनी आहे.  ढिगारा उपसून लोकांना बाहेर काढण्यास मोठी अडचण येत आहे. इमारतीकडे जाणारे सर्व रस्ते हे खूपच अरुंद आहेत, त्यामुळे आवश्यक ती उपकरणं रस्त्यानं आत नेता येत नाही. ढिगारा उपसणं,  लोखंडी सळ्या कापण्यासाठी मशिनरी नसल्यानं हातानं काम करावं लागत आहे. बाजूला इमारतीच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे. यासाठी इमारतीला लोखंडी सळ्यांचा आधार दिला आहे, या सगळ्यांना धक्का लागल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.' त्यामुळे  कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवणं आणि लोकांना वाचवणं ही मोठी कसरत असल्याचं अग्निशमन दलाच्या  अधिकाऱ्यानं सांगितलं.

 जेसीबी आत नेला असता तर आतापर्यंत ढिगारा उपसून झाला असता मात्र अरूंद रस्त्यामुळे सगळेच हतबल असल्याचं  अधिकारी म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:dongari Building Collapse narrow lanes Access is a very big challenge for rescue opreation