पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंगरी दुर्घटना : मानवी साखळीद्वारे मदतकार्य सुरू

डोंगरी इमारत दुर्घटना

मुंबईतल्या डोंगरी परिसरातील केसरबाई ही चार मजली इमारत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर  अनेकजण आतमध्ये अडकले आहेत.  या इमारतीत १६ घरं होती अशी प्राथमिक माहिती समजत आहे. सध्या युद्धपातळीवर बाचवकार्य सुरू आहे. बचाव कार्यात अरूंद रस्त्यांमुळे मोठा अडथळा येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली आहे. 

PHOTOS : डोंगरीत चार मजली इमारत कोसळली

ढिगारा उपसणं,  लोखंडी सळ्या कापण्यासाठी  आवश्यक ती उपकरणं आत नेता येत नसल्यानं मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे एनडीआरएफ आणि स्थानिक रहिवाशांनी परस्पर सहकार्यानं मदतकार्यास सुरूवात केली आहे. स्थानिक रहिवाश्यांनी मानवी साखळी तयार केली आहे. या साखळीद्वारे ढिगारा वाहून नेला जात आहे. 

त्याचप्रमाणे या मानवीसाखळीद्वारे जखमीपर्यंत प्राथमिक उपचारही पोहोचवले जात आहेत. इमारतीकडे जाणारे सर्व रस्ते हे खूपच अरुंद आहेत, त्यामुळे आवश्यक ती उपकरणं रस्त्यानं आत नेता येत नाही. ढिगारा उपसणं,  लोखंडी सळ्या कापण्यासाठी मशिनरी नसल्यानं हातानं काम करावं लागत आहे. बाजूला इमारतीच्या नुतनीकरणाचं काम सुरू आहे.  यासाठी इमारतीला लोखंडी सळ्यांचा आधार दिला आहे, या सगळ्यांना धक्का लागल्यास मोठं नुकसान होऊ शकतं.' त्यामुळे  कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा हटवणं आणि लोकांना वाचवणं ही मोठी कसरत असल्याचं अग्निशमन दलाच्या  अधिकाऱ्यानं सांगितलं.

मदत कार्यात येणारा अडथळा पाहून  स्थानिकांनी मानवी साखळी रचून मदतकार्यास सुरूवात केली आहे.