पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डोंबिवलीत धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी

मुंबई लोकल

डोंबिवलीमध्ये धावत्या लोकलमधून पडून तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे या तरुणाला आतमध्ये जाता आले नाही. विशाल गुरव (३१ वर्ष) असे या तरुणाचे नाव आहे. 

 

'इतिहासावर चर्चा करण्यापेक्षा आताच्या विषयांवर चर्चा करा'

विशालने नेहमीप्रमाणे डोंबिवलीवरुन सीएसएमटी स्थानकाकडे जाणारी लोकल पकडली. मात्र लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे त्याला आतमध्ये जात आले नाही. विशाल दरवजावरच उभा होता. गर्दीमुळे डोंबिवली-कोपर स्थानका दरम्यान तोल जाऊन तो धावत्या लोकलमधून खाली पडला आणि गंभीर जखमी झाला.

'सावरकरांचा विरोध करणाऱ्यांना अंदमानच्या तुरुंगात पाठवा' 

गंभीर जखमी झालेल्या विशालला ताबडतोब नजीकच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विशालला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. डोंबिवलीमध्ये गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून  प्रवासी गंभीर जखमी झाल्याची किंवा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मागच्या महिन्यात लोकलमधून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला होता. 

दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर