पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वरळीमध्ये राहणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण

कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी खासगी लॅबला परवानगी देण्यात येणार (संग्रहित छायाचित्र)

मुंबईमध्ये कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणि मृतांमध्ये वाढ होत चालली आहे. अशात मुंबईतील दाट लोकवस्ती असलेल्या वरळी येथे कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे. वरळी येथे राहणाऱ्या एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली आहे. तर, राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांपैकी सर्वाधिक ७४८ रुग्ण हे मुंबईतील आहेत.

लॉकडाऊन वाढविला तरी काही उद्योगांना सूट देण्याची वाढती मागणी

वरळीमध्ये राहणाऱ्या एका ४७ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर मुंबईतील सरकारी रुग्णालयात कार्यरत आहे. ७ एप्रिलला या डॉक्टरला श्वसनाला त्रास होत होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. आज आलेल्या तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर सध्या कोरोना कक्षात उपचार सुरु आहेत. 

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन राज्यांमध्ये पुरेशा प्रमाणात उपलब्ध

दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे १६२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १,२९७ वर पोहचला आहे. तर आतापर्यंत राज्यात ७२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यामधील ४५ जण मुंबईतील आहेत. तर राज्यातील ११७ कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 

औषध देण्याच्या निर्णयानंतर ट्रम्प यांनी मानले मोदींचे आभार