पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बलात्कार प्रकरण: न्यायालयाने आदित्य पांचोलीला दिला अंतरिम जामीन

आदित्य पांचोली

बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोलीवर बॉलिवूडच्या एका प्रसिध्द अभिनेत्रिने  बलात्कार केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. आदित्य पांचोली यांच्याविरोधात केलेली तक्रार जवळपास १० वर्षापूर्वीच्या प्रकरणाची आहे. दरम्यान, या प्रकरणात आदित्य पांचोलीला ३ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयाने आदित्य पांचोली याच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणी ३ ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. 

कर्नाटकः १५ बंडखोर आमदारांसाठी आता काँग्रेस सुप्रीम कोर्टात

वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये आदित्य पांचोलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीवरुन त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये बलात्कार, विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणे, मारहाण करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी याप्रकरणी आदित्य पांचोलीने प्रतिक्रिया दिली होती. 'मला या प्रकरणामध्ये चूकीच्या पध्दतीने अडकवले जात आहे. माझ्याकडे सर्व पुरावे आणि व्हिडिओ आहे. मी पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. जर त्यांनी मला काही स्टेटमेंटसाठी फोन केला तर मी त्यांना सहकार्य करेल. मी सर्व प्रकारच्या चौकशीसाठी तयार आहे.' असे आदित्य पांचोली याने सांगितले होते. 

गणेशोत्सवासाठी लालपरी सज्ज; २२०० जादा बसेस सोडणार