पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलीच्या विनयभंग प्रकरणी DIG निशिकांत मोरे निलंबित

पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे

नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निशिकांत मोरे यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. निशिकांत मोरे यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या बर्थ-डे पार्टीमध्ये विनयभंग केल्याचा आरोप आहे. 

विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचे निलंबन

५ जून २०१९ ला पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी डीआयजी निशिकांत मोरे यांना बोलावले होते. वाढदिवसाचा केप कापल्यानंतर निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावलेला केक खाल्ला. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तळोजा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती. 

विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका

दरम्यान, पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर २६ डिसेंबरला निशिकांत मोरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ) (१) (आय), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून मोरे फरार आहेत. दरम्यान, निशिकांत मोरेचा अटकपर्व जामीन अर्ज पनवेल कोर्टाने आज फेटाळला आहे. तसेच हायकोर्टात अपील करण्यासाठी कोणताही दिलासा देण्यात आला नाही. तर पुढील तपासासाठी मोरेंची अटक आवश्यक असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी कोर्टात सांगितले आहे.

पुण्यातील मनसे कार्यालयाला 'भगवा' साज