पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विनयभंगाच्या धक्कादायक प्रकारानंतर बेपत्ता झालेली पीडिता सुरक्षित

पोलिस अधिकाऱ्यानेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. (संग्रहित छायाचित्र)

पोलिस उपमाहानिरीक्षक निशिकांत मोरे याने विनयभंग केल्याच्या धक्कादायक प्रकारानंतर सुसाइड नोट लिहून बेपत्ता झालेली मुलगी सुखरुप असल्याची माहिती समोर येत आहे. पीडित तरुणी आपल्या नातेवाईकासोबत उत्तर प्रदेशात गेली असून तिला सुखरुप परत आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी हालचाली सुरु केल्याचे वृत्त 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीने दिले आहे.  

मुलीच्या विनयभंग प्रकरणी DIG निशिकांत मोरे निलंबित

जवळपास सहा महिन्यापूर्वी  ५ जून २०१९ रोजी पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी डीआयजी निशिकांत मोरे यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या मोरेंनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावलेला केक खात तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. याप्रकरणी पीडित मुलीने तळोजा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती. पीडितेच्या वाढदिवसात पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणातील अनेक घटनाची उकल होत गेली.  

विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचे निलंबन

पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर २६ डिसेंबरला निशिकांत मोरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (अ) (१) (आय), ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासूनमोरे फरार आहेत. निशिकांत मोरेचा अटकपर्व जामीन पनवेल कोर्टाने गुरुवारी फेटाळला असून त्याला अटक होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणारा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीवरील चालक कॉन्स्टेबल दिनकर साळवे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.