पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DIG मोरे प्रकरण: मुलीसोबत सापडलेल्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे प्रकरणात  बेपत्ता मुलीसोबत सापडलेल्या तरुणाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण आले आहे. १९ वर्षीय तरुणाविरोधात पोलिसांनी पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाला बुधवारी कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्याची रवानगी १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली आहे. 

'जाणता राजा'च्या उपाधीवरुन शरद पवारांनी साताऱ्यात केलं हे भाष्य

डीआयजी निशिकांत मोरे प्रकरणात बेपत्ता झालेली मुलगी देहराडून येथे सापडली. ही तरुणी १९ वर्षीय तरुणासोबत होती. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन मुंबईमध्ये आणले होते. पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या गॅरेजमध्ये हा तरुण कामाला होता. चार ते पाच महिन्यांपासून तो त्याठिकाणी काम करत होता. त्यामुळे बेपत्ता मुलगी आणि या तरुणाची ओळख झाली होती, अशी माहिती परिमंडळ २ चे पोलिस आयुक्त अशोक दुधे यांनी दिली आहे. 

पीएमसी बँक: वाधवान पितापुत्रांची सुटका, निवासस्थानी कैदेत

पीडित मुलीने डीआयजी निशिकांत मोरे यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. ही मुलगी ६ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाली होती. नवी मुंबई पोलिस तिचा शोध घेत होते. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी निशिकांत मोरे यांनीच तिचे अपहरण केले असल्याचा आरोप केला होता. मात्र आता बेपत्ता तरुणी सापडल्यामुळे मोरे यांच्यावर अपहरण केल्याच्या आरोपात काहीच तथ्य नाही असे सांगत मोरेंविरोधात काहीच पुरावे नसल्याचे दुधे यांनी स्पष्ट केले आहे.  

'डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची १०० फुटाने वाढवणार'