पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

DIG निशिकांत मोरे प्रकरण: बेपत्ता मुलगी सापडली

पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे

पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे प्रकरणात बेपत्ता झालेली मुलगी सापडली आहे. देहराडून येथून मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १९ वर्षीय तरुणासोबत मुलगी देहराडून येथे सापडली. दोघांनाही नवी मुंबई येथे आणण्यात आले आहे. पीडित मुलगी ६ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाली आहे. नवी मुंबई पोलिस तिचा शोध घेत होते अखेर ती सापडली आहे. 

 

'दालनं, पालकमंत्र्यांची भांडणं संपली की सरकार शेतकर्‍यांकडे लक्ष देईल'

पुणे मोटार परिवहन विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांच्यावर नवी मुंबईतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या आरोप आहे. ५ जून २०१९ ला पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी निशिकांत मोरे यांना घरी बोलावले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावलेला केक खाल्ला. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 

होय शरद पवार जाणता राजा आहेत; जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर

दरम्यान, या प्रकरणामध्ये पीडित मुलगी ६ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाली होती. रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या करते. माझ्या आत्महत्येला शशिकांत मोरे जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले होते. दरम्यान, याप्रकरणी, २६ डिसेंबरला निशिकांत मोरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ९ जानेवारी रोजी विनयभंग प्रकरणात निशिकांत मोरे यांना निलंबित करण्यात आले होते. 

BSP नेत्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप