पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विनयभंग प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरचे निलंबन

कॉन्स्टेबल दिनकर साळवे

पोलिस उपमहानिरीक्षक निशिकांत मोरे यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता. या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारी गाडीचे चालक कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांना निलंबित करण्यात आले आहे.  दिनकर साळवे यांनी पीडित मुलीच्या वडिलांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर गृहखात्याकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

विरोधकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना ममता बॅनर्जींचा झटका

पीडित मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या वडिलांनी डीआयजी निशिकांत मोरे यांना बोलावले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर निशिकांत मोरे यांनी पीडित मुलीच्या चेहऱ्यावर लावलेला केक खाल्ला. या प्रकरणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने तळोजा पोलिस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. मात्र सहा महिने उलटून गेले तरी पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती. मात्र पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांच्या हस्तक्षेपानंतर मोरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून मोरे फरार आहेत.

पुण्यातील मनसे कार्यालयाला 'भगवा' साज

दरम्यान, पीडित मुलगी ६ जानेवारी रोजी सुसाईड नोट लिहून घरातून बेपत्ता झाली आहे. रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या करते. माझ्या आत्महत्येला शशिकांत मोरे जबाबदार असल्याचे तिने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलिस या मुलीचा शोध घेत आहे. दरम्यान, याप्रकरणाला वेगळे वळण आले होते कारण 'मी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर आहे याप्रकरणात गप्प रहा' अशा प्रकारची धमकी कॉन्स्टेबल दिनकर साळवे यांनी दिली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला होता. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांना धमकावल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचा ड्रायव्हर दिनकर साळवे यांना निलंबित करण्यात आले आहे. 

भाजप-मनसे यांच्यातील युतीसंदर्भात फडणवीस म्हणाले की...