पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धारावीत आतापर्यंत कोरोनाचे ५ रुग्ण, अडीच हजार लोक होम क्वारंटाइन

कोरोना

मुंबईतील सर्वांत मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत कोरोना विषाणूनं पाश आवळायला सुरुवात केली आहे.  धारावीत  नुकताच कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. बालिगा नगरमधील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. रविवारी या भागात  आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे या परिसरात कोरोना विषाणूच्या रुग्णांचा आकडा हा पाचवर पोहोचला आहे. २१ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं.

आतापर्यंत धारावीत अडीच हजार लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे. एकट्या बालिगा नगरमधून हाय रिस्क असलेले १३२ ज्येष्ठ नागरिक आणि ३२ आजारी व्यक्तींच्या स्त्राव चाचण्या घेण्यात आल्या आहेत. हाफकिन इन्स्टिट्यूडमध्ये हे स्त्राव नमुने पाठवण्यात आले आहेत, या चाचण्यांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे. 

लॉकडाऊन काळातही भाजप आमदाराकडून विठ्ठल-रक्मिणीची महापूजा

दरम्यान शुक्रवारी धारावीतील ३५ वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली. डॉक्टरला कोरोना झाल्याचे समजताच डॉक्टरच्या कुटुंबातील सदस्यांची तपासणी करुन त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. तसंच, धारावीतील ज्या बिल्डिंगमध्ये डॉक्टर राहतो ती मुंबई महानगरपालिकेने सील केली आहे. डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

आज राज्यात एकूण २६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रविवारी दुपारपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही ६६१ वर पोहोचली. तर गेल्या १२ तासांत देशात कोरोना विषाणू बाधित ३०२ नवे रुग्ण आढळले. बारा तासांत वाढलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे देशात  कोरोना बाधितांचा आकडा हा ३ हजार ३७४ वर पोहोचला आहे. या आकड्यांमध्ये  बरे झालेल्या आणि डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांचाही  समावेश आहे. आतापर्यंत बाधितांपैकी २६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर ७७ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. 

मलेशियाला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या 'तबलिगी'च्या ८ जणांना अटक