पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; धनराज महालेंची घरवापसी

धनराज महाले

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी आमदार धनराज महाले यांनी पुन्हा घरवापसी केली आहे. धनराज महाले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर धनराज महाले यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वीच धनराज महाले यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 

काश्मीरमधील स्थिती सुधारेल, थोडा धीर धरा; केंद्राचा कोर्टात युक्तिवाद

दिंडोरी मतदार संघाचे शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले यांनी १८ जानेवारी २०१९ रोजी शिवसेनेला रामराम ठोकत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला होता. मात्र अवघ्या ७ महिन्यातच धनराज महाले यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंध हातात बांधले आहे. 

विधानसभा निवडणूक : ३० ते ४० टक्के मंत्र्यांना भाजप उमेदवारी 

धनराज महाले हे समाजवादीचे नेते आणि माजी खासदार स्वर्गिय हरिभाऊ महाले यांचे ते चिरंजीव आहेत. दिंडोरी मतदार संघातील  शिवसेनेचे हेवेदावे आणि पक्षांतर्गत राजकारण पाहता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी देखील देण्यात आली होती. 

महाजनादेश यात्रेला काँग्रेसचे पोलखोल यात्रेने उत्तर