पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तावडेंचा कारभार होता गोल..गोल, मुंडेंचा टोला

धनंजय मुंडे

राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना संधी देण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण खाते काढण्यात आले असून ते मंत्रिमंडळात नव्याने आलेले शेलार यांच्याकडे देण्यात आले आहे. यावरुन विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तावडे टोला लगावत शेलार यांचे अभिनंदन केले आहे. तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्याची मागणीही केली आहे. मुंडे यांनी यासंबंधी टि्वट केले आहे. 

गिरीश महाजनांना फोडाफोडीचे अतिरिक्त खाते द्याः धनंजय मुंडे

यात त्यांनी म्हटले आहे की, तावडेंचा कारभार होता गोल गोल, 
शिक्षणांचा वाजवला होता ढोल ढोल,
शेलार तरी सावरणार का तोल?
शेलार, तुमच्यावर भरोसा ठेवायचा का?
नवनिर्वाचित शिक्षणमंत्री @ShelarAshish यांचे अभिनंदन! 
स्टेट बोर्डाच्या १०वीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण न देऊन केलेल्या अन्यायाला न्याय द्या. 

तत्पूर्वी, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजून एक खाते वाढवायला हवे होते. विरोधी पक्षाच्या आमदारांना फोन करून फोडाफोडी करण्यातच यांचा वेळ जातो. त्यामुळे फोडाफोडीचे अतिरिक्त खाते गिरीश महाजन यांच्याकडे द्यायला हवे, असा टोला त्यांनी लगावला होता.