पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यात भाजप-राष्ट्रवादी बंडखोर गटाचं नवं सरकार; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री

राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरु असताना अचानक महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण आले आहे. मुंबईतल्या राजभवनामध्ये सर्वात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचं नवं सरकार आले आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री होऊ पाहणाऱ्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. 

राजभवनामध्येच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात अचानक झालेल्या या घडामोडींमुळं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भाजपने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा दाखल केला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते अजित पवार यांनी सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला. त्यानंतर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथविधीसाठी बोलावले. राजभवानामध्ये शपथविधी सोहळा पार पडला. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिनंदन केले.