पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एवढी लाचार शिवसेना कधीच पाहिली नाही, फडणवीसांचा प्रहार

देवेंद्र फडणवीस

सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. आजच्या दिवसाची इतिहासात नोंद होईल. इतकी वर्षे सावरकरांचा सन्मान करणारी शिवसेना सत्तेसाठी त्यांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसली आहे. आजच्या एवढी लाचार शिवसेना माझ्या आयुष्यात मी कधीच पाहिली नव्हती, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा गौरव प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळला

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव भाजपच्यावतीने विधानसभेत मांडण्यात आला होता. परंतु, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी हा प्रस्ताव फेटाळला. 

त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी काँग्रेससह शिवसेनेवर तीव्र शब्दांत टीका केली. 

दिल्ली हिंसाचाराविरोधात काँग्रेस काढणार शांतीमार्च

ते म्हणाले, काँग्रेसच्या शिदोरी मासिकात सावरकर हे माफीवीर आहेत, ते बलात्कारी आहेत, असे प्रसिद्ध झाले आहे. या मासिकावर बंदी घालावी. दुर्देव हे आहे की, आयुष्यभर सावरकरांचा सन्मान करणारी शिवसेना सत्तेसाठी आज त्यांचा अपमान करणाऱ्यांबरोबर बसली आहे.

दिल्लीत तातडीने लष्कर तैनात करा; केजरीवालांची गृहमंत्रालयाकडे मागणी