पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मेरीट नसलेल्यांनी सत्ता मिळवली: फडणवीस

देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला ७० टक्के मार्क्स मिळाले तरी आम्ही मेरिटमध्ये आलो नाही. मात्र ज्यांना ४० टक्के मार्क्स मिळाले. ते मेरीटमध्ये नसताना देखील त्यांनी सत्ता मिळवली. ही लोकशाही आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षात बसण्याचा आम्हाला अनुभव आहे. जनतेच्या कल्याणासाठी विरोधी पक्ष कायम काम करेल, असे त्यांनी सांगितले. 

 

'पुढे काय करायचं, थोडा वेळ द्या'; पंकजा मुंडे मोठा निर्णय घेणार ?

पुढे फडणवीस यांनी सांगितेल की,  कुठल्याही महापुरुषाचे नाव घेण्यास मनाई नाही. आम्ही याठिकाणी छत्रपतींचे नाव घेऊन आलो आहे. आम्ही कधीही राजे झालो नाही, कालही सेवक होतो आणि आजही सेवक आहे. तसंच, तुम्ही मला किती नावं ठेवली. माझ्याबद्दल काहीही बोलले तरी देखील मी माझे कर्तव्य करेल. मला जी जाबादारी मिळाली आहे ती यासाठीच मिळाली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. 

'राधाकृष्ण विखे-पाटील आमचेच आहेत, आम्ही त्यांना ओढून आणू'

मी पुन्हा येईल असे म्हटले होते. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला निवडणून दिले. त्यांची अपेक्षा तिच होती पण जनादेशाचा सन्मान झाला नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. मी पुन्हा येईल असे म्हणालो होतो पण मी टाईम टेबल सांगितला नव्हता. लोकशाही आहे लोकशाही मध्ये अनेक गोष्टी घडत असतात. त्यामुळे आता वाट पहा, असे देखील ते म्हणाले.  

देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड

दरम्यान, जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करु. मुख्यमंत्री तुम्ही केव्हाही आवाज द्या तुमच्या आवाजाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद देऊ. सहकार्य केव्हाही मिळेल, असे त्यांनी सांगितले. मात्र सरकार जनतेचे सहकार्य करत नसेल तर त्यावेळी आम्ही सरकारवर आसोडे ओडण्याचे काम करु, असे देखील फडणवीस यांनी सांगितले. 

शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद: मुख्यमंत्री