माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे. विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'आम्हाला ७० टक्के मार्क्स मिळाले तरी आम्ही मेरिटमध्ये आलो नाही. मात्र ज्यांना ४० टक्के मार्क्स मिळाले. ते मेरीटमध्ये नसताना देखील त्यांनी सत्ता मिळवली. ही लोकशाही आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षात बसण्याचा आम्हाला अनुभव आहे. जनतेच्या कल्याणासाठी विरोधी पक्ष कायम काम करेल, असे त्यांनी सांगितले.
पुढील बातमी