पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...नाहीतर पंतप्रधान मोदींची माफी मागाः फडणवीस

शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस (HT photo)

भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. विशेषतः सीएए आणि एल्गार परिषदेच्या तपासावरुन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. सीएए नागरिकता घेणारा नव्हे तर देणारा कायदा असल्याचे ते म्हणाले. देशातील काही पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेत येण्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. समाजासमाजात तेढ निर्माण केली जात आहे. लोकांना संभ्रमित करण्याचे काम ते केरत आहेत. शरद पवार यांनी सीएए मागासवर्गीय आणि आदिवासींविरोधात असल्याचे म्हटले आहे. पण सीएए मागासवर्गीय आणि आदिवासीविरोधात आहे हे सिद्ध करावे. हे खोटं ठरलं तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, असे आव्हान दिले. 

हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लावा, आता फडणवीसांचे ठाकरेंना आव्हान

यावेळी फडणवीस यांनी एल्गारचा तपास एनआयएकडे दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आणि शरद पवारांवर टीका केली. 

ते म्हणाले, एनआयएच्या तपासाला शरद पवारांचा विरोध आहे. चौकशीतून सत्य बाहेर येणार आहे. त्यामुळे ते घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांचा विरोध आहे. चौकशीतून शहरी नक्षलवाद्यांचे सत्य बाहेर येईल म्हणून समांतर चौकशीचा आटापिटा सुरु आहे. 

शिवसेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली, चंद्रकांत पाटलांची टीका

सीएएमुळे मागासवर्गीय आणि आदिवासींना धोका नाही, हे पवार यांनाही माहीत आहे. पण मतांचे राजकारण करण्यासाठी ते यावर बोलायला तयार नाहीत. सीएए मागासवर्गीय किंवा आदिवासीविरोधात असल्याचे सिद्ध करा अन्यथा पंतप्रधान मोदींची माफी मागा, असेही ते म्हणाले. 

चंद्रकांत पाटील विनिंग टीमचे कॅप्टन

भाषणाच्या सुरुवातीला ते म्हणाले की, भाजप ही हरलेली नाहीतर जिंकलेली टीम आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा सरकार आणणार आहोत. चंद्रकांत पाटील हे कालही विनिंग टीमचे कॅप्टन होते आणि आजही. भाजपमध्ये पद ही शोभेची वस्तू नाही ती जबाबदारी आहे. मिरवण्यासाठी येथे पद दिले जात नाही. भाजप हे उपकरण आहे. आम्हाला केवळ सत्ता उपभोगायची नाही. भाजपत कुठलीच गोष्ट वारसात मिळत नाही. ती झगडून घ्यावी लागते. सामाजिक परिवर्तनासाठी सत्ता हवी आहे. 

महाविकास आघाडी अंतर्गत मतभेदामुळे तुटेलः एकनाथ खडसे

काश्मीरमध्ये नवी पहाट

यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. काश्मीरमध्ये आता रक्ताचे पाट नव्हे तर नवी पहाट दिसते, असे ते म्हणाले.